सिंगापूर – सिंगापूरमध्ये करोनाचे नवीन 233 रुग्ण आढळून आले असून त्यातील 59 रुग्ण भारतीय आहेत, अशी माहिती आज अधिकृत सूत्रांनी दिली. गर्दीच्या स्पॉटशी संबंध आल्याने या लोकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे असे आरोग्य सूत्रांनी सांगितले. असे सात नवीन क्लस्टर सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी सील केले आहेत.
सिंगापुर मध्ये एकूण 976 लोकांना करोनाची बाधा झाली आहे. सिंगापूरमध्ये अजूनही अनेक भारतीय वास्तव्याला आहेत. त्यांनी करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर त्या देशातच राहणे पसंत केले आहे. त्या देशात अजून मोठ्या प्रमाणात या रोगाचा फैलाव झालेला नसला तरी आता मात्र तेथील रुग्ण हळूहळू वाढत असल्याने तेथेही मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.