नगर – विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडे प्रस्तावित असलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देश विचारात घेऊन ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे.अशा पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक यांच्या नगर जिल्ह्यातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.अशी माहिती पोलिस अधिक्षक इशू सिंधू यांनी दिली.
पो.नि.गोकुळ औताडे – शिर्डी पोलिस ठाणे, बदलीचे ठिकाण वाचक पोलिस उपअधिक्षक कार्यालय शिर्डी, पो.नि.अरुण परदेशी- राहाता पोलिस ठाणे ते सायबर पोलिस ठाणे नगर, पो.नि.पांडुरंग पवार- जामखेड पोलिस ठाणे ते वाचक पोलिस अधिक्षक कार्यालय.पो.नि.हनुमंतराव गाडे- अकोला पोलिस ठाणे ते साई मंदिर सुरक्षा शिर्डी, पो.नि.प्रविणचंद लोखंडे- कोपरगाव तालुका पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा.स.पो. नि.दिपक गंधाले- शिर्डी पोलिस ठाणे ते प्रभारी अधिकारी शिर्डी.पो.नि.सुभाष घोये- साई मंदिर शिर्डी ते राहाता पोलिस ठाणे.पो. नि.प्रभाकर पाटील- सायबर पोलिस ठाणे ते जामखेड पोलिस ठाणे.पो. नि.अरविंद जोंधळे- नियंत्रण कक्ष ते अकोले पोलिस ठाणे.पो.नि.अनिल कटके- वाचक पोलिस अधिक्षक कार्यालय ते कोपरगाव तालुका.पो. नि.दिलीप निघोट- आर्थिक गुन्हे शाखा ते नियंत्रण कक्ष.महिला पोलिस उपनिरीक्षक संगिता गिरी -लोणी पोलिस ठाणे ते साई मंदिर सुरक्षा शिर्डी. पोलिस उपनिरीक्षक जाधोर- एमआयडीसी पोलिस ठाणे ते
जिल्हा विशेष शाखा
पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील- कोतवाली पोलिस ठाणे ते आश्वी पोलिस ठाणे.पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी नेवासा पोलिस ठाणे ते संगमनेर शहर.पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे- श्रीरामपूर शहर ते नेवासा पोलिस ठाणे.पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे- आश्वी पोलिस ठाणे ते श्रीरामपूर शहर.पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत- श्रीरामपूर शहर ते नगर तालुका पोलिस ठाणे.पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम- संगमनेर शहर ते राहरी पोलिस ठाणे. पोलिस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ-राहरी पोलिस ठाणे ते कोतवाली पोलिस ठाणे अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.