पिंपरी, (प्रतिनिधी) – उद्योग प्रोत्साहन विभाग, अंतर्गत व्यापार, वाणिज्य आणि उद्योग, राष्ट्रीय नमुना कार्यालयाचा पश्चिम विभागीय क्षेत्रीय संचालन विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीने आकुर्डी येथे, पश्चिम क्षेत्रासाठी घाऊक किंमत निर्देशांकावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पश्चिम विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना औद्योगिक घटकांकडून घाऊक किंमतींच्या संकलनाच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन के पी पारिसेलवन, उपमहासंचालक, डीपीआयआयटी (एनआयसी), श्रीनिवास उप्पाला, उपमहासंचालक, पश्चिम विभाग,
आलोक कुमार, संचालक, एनएसएसओ (एफओडी) आरओ पुणे, अमित दलाल, वैज्ञानिक – सी. एनआईसी, डीपीआईआईटी, दुलाल बिस्वास, सहाय्यक संचालक, ओईए, डीपीआईआईटी आणि नरेश पाटील, उपसंचालक, एनएसएसओ (एफओडी) आरओ पुणे हे देखील उपस्थित होते.
मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर म्हणून डब्ल्यूपीआई चे महत्त्व स्पष्ट करताना, आलोक कुमार यांनी डब्ल्यूपीआईच्या नवीन मालिकेसाठी डेटा संकलनाला गती देण्यावर आणि डेटा संकलनाच्या विविध वैचारिक आणि तांत्रिक मुद्द्यांवर भर दिला. श्रीनिवास उप्पाला यांनी आपल्या भाषणात डब्ल्यूपीआई च्या नवीन मालिकेत आयटम बास्केटमधील बदलांचे महत्त्व सांगितले.
तर दुलाल बिस्वास यांनी डब्ल्यूपीआई डेटा संकलन आणि तपशील मार्गदर्शक तत्त्वांवर माहिती दिली. मूलभूत किंमतींच्या अहवालाशी संबंधित संकल्पना आणि व्याख्या आणि करार/निविदा किंमत, प्रशासित किंमत, स्टॉक क्लिअरन्स किंमत तपशीलवार चर्चा करण्यात आली. केपी परिसेलवन आणि अमित दलाल यांनी ऑनलाइन डीपीआईआईटी पोर्टलचे प्रात्यक्षिक दाखवले आणि झोनमधील डेटा संकलनाच्या एकूण स्थितीवर चर्चा केली. नरेश पाटील यांनी प्रस्तावना, आभार प्रदर्शन केले.