वाहतूक पोलिसाला मारहाण; 7 जणांवर गुन्हा

लोणावळा  – लोणावळा शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली करीत सुसाट सुटलेल्या तरुणांना हटकणाऱ्या वाहतूक पोलिसाला शिविगाळ करीत मारहाण करणाऱ्या सात तरुणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद संजय शिंदे (वय 19, रा. भावडी, अहमदनगर), संकेत कैलास पोडगन (वय 21, रा. मोहननगर, पिंपरी), अमोल सिद्धार्थ खंडागळे (वय 21, पिंपरी कॅम्प), प्रथमेश वाघमारे (वय 18, पिंपरी), आकाश बाबासाहेब रणसिंग (वय 21, रा. भाटनगर, पिंपरी), विक्रम पप्पू लोंढे (वय 19, रा. फुरसुंगी) व प्रतीक बनसोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील हडपसर आणि पिंपरी येथील सुमारे 12 ते 14 तरुणांचे टोळके दुचाकीवरून ट्रिपल सीट लोणावळा शहरात भुशी धरणावर आले होते. सायंकाळी तेथून परतत असताना सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील कुमार चौकात वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.

तसेच जाताना त्यांना शिवीगाळ करीत पळ काढला. तेथून पुढे गेल्यावर ए-वन चिक्की चौकात वाहतूक नियमन करीत असलेले पोलीस जीवन गवारी यांनी या टोळक्‍याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील काही तरुणांनी गवारी यांना घेरून शिविगाळ करीत मारहाण केली. दरम्यान त्याठिकाणी पोचलेल्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या सर्व तरुणांना पकडून पोलीस ठाण्यात नेले.

सरकारी कामात अडथळा आणून “ऑन ड्युटी’ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी यातील सात तरुणांच्या विरोधात भादवी कलम 332, 353, 141, 147 व 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी तपास
करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)