सोशल मीडियावर एक बदकांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ केरळमधील एका शहरातील आहे. अंदाजे शंभर बदकांचा एक थवा रस्त्यावरून क्रॉस करतांनाचा हा व्हिडीओ आहे.
बहुसंख्य बदके पूर्व व दक्षिण भारतामध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये बदकांची संख्या सर्वात जास्त असल्याचे बोलल्या जाते. त्यानंतर आसाम, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ बिहार व ओरिसा या राज्यांच्या क्रमांक लागतो.