Traditional Sports Mahakumbh (Kho-Kho) :- क्रीडा महाकुंभ मधील स्पर्धा आता उत्तरार्धात पोहोचल्या असून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा केंद्रावर झालेल्या खो-खो स्पर्धेच्या किशोर- किशोरी गटात महात्मा गांधी व शिवनेरी संघांनी विजेतेपद पटकाविले. तर स्पर्धेच्या वरिष्ठ गटात पुरुषांचे विजेतेपद एम.पी.एल. (मुंबई प्रो लायन्स) ने शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमी तर महिलांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीने शिवनेरीचा पराभव करत पटकाविले.
किशोर गटात महात्मा गांधी विद्या मंदिरने ओम साईश्वर सेवा मंडळाचा २०-१९ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने विजय मिळवला. महात्माच्या आर्यन चव्हाण (२ मि. संरक्षण), अक्षय राठोड (१.१०, १ मि. संरक्षण व ६ गुण), अनिल राठोड (१.१० मि. संरक्षण व ३ गुण) तर ओम साईश्वरच्या प्रशिक मोरे (१.२०, १ मि. संरक्षण व ४ गुण), अधिराज गुरव (१ मि. संरक्षण व ९ गुण) यांची कामगिरी पराभवात सुध्दा उठून दिसली.
किशोरींच्या गटात शिवनेरीचा सेवा मंडळाने विद्या प्रबोधिनी इंग्लिश शाळेचा ९-६ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. शिवनेरीच्या मुस्कान शेख (नाबाद ६.३० मि. संरक्षण व २ गुण), शर्वी नडे (३ मि. संरक्षण व २ गुण), आरुषी गुप्ता (२.४० मि. संरक्षण) यांनी तर सृष्टी जाधव (२ मि. संरक्षण), विभूती धुळप (१.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सामना गाजवला.
खो-खोच्या अन्य गटांच्या सामन्यात कुमार (१७ वर्षाखालील) गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीने ओम साईश्वर सेवा मंडळाचा १०-८ असा एक डाव २ गुणांनी पराभव केला. मुलींच्या सामन्यात शिवनेरीचा सेवा मंडळाने शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीवर ८-७ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने विजय साजरा केला.