पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे-लोणावळा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (दि.18) मध्य रेल्वे, पुणे विभागातर्फे पुणे-लोणावळा मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या गैरसोयीसाठी खेद व्यक्त केली आहे.
पुणे आणि लोणावळा प्रवास करणार्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो प्रवासी या लोकलने प्रवास करत असतात. अनेकांना हा प्रवास सोयीचा ठरतो. त्यासोबत लोकलच्या वेळादेखील प्रवाशांच्या सोयीनुसार करण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी या लोकलने प्रवास करतात.
पिक अवर्समध्ये या लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळते. मात्र लोकलची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थी आणि कर्मचार्यांची गैरसोय होत नाही. मात्र आता एक दिवसाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रद्द केलेल्या गाड्यांची माहिती-
01562 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 9.57 रद्द
01564 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 11.17 वाजता रद्द
01592 शिवाजी नगर- लोणावळा लोकल शिवाजीनगर येथून सुटणारी दुपारी 12.05 वाजताची लोकल रद्द
01566 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 15.00 वाजताची लोकल रद्द
01588 शिवाजी नगर- तळेगाव लोकल शिवाजीनगर येथून 15.47 वाजताची लोकल रद्द
01568 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 16.25 वाजताची लोकल रद्द
01570 शिवाजी नगर- लोणावळा लोकल पुण्याहून 17.20 वाजताची लोकल रद्द
01559 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी 10.05 वाजताची लोकल रद्द
01591 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी 11.30 वाजताची लोकल रद्द
01561 लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून 14.50 वाजताची लोकल रद्द
01589 तळेगाव-पुणे-लोकल तळेगावहून 16.40 वाजताची लोकल रद्द
01565 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून 17.03 वाजताची लोकल रद्द
01567 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून 18.08 वाजताची लोकल रद्द
01569 लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून 19.00 वाजताची लोकल रद्द