बारामती, (प्रतिनिधी) – स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 22) महावीर भवन येथे हा मेळावा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार यांनी बारामतीत व्यापारी महासंघाचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी देखील मेळावा घेण्याचे नियोजन केले होते; मात्र व्यापारी संघातून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर बारामती शहरात स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना करण्यात आली. बारामती नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते तसेच अॅड. सुधीर पाटसकर यांनी पुढाकार घेत या संघाची स्थापना केली. शहरातील छोटे मिया व्यापार्यांचा या महासंघास प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर शहरात शरद पवार यांच्या उपस्थितीत महावीर भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यापार्यांचे मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. श्री महावीर भवन येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे. शहर व तालुक्यातील व्यापार्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.