मंचर, (प्रतिनिधी) – पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १७ दिव्यांगांना प्रत्येकी साडेतेवीशे रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच नीलम अनिल वाळुंज यांनी दिली.
दिव्यांग बांधवांना निधी मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले भविष्यात अपंग, दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबवण्यात येणार असल्याचे सरपंच वाळुंज यांनी सांगितले.
यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, भाऊसाहेब पोंदे, शुभम वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.