#व्हिडीओ : भल्या मोठ्या मगरी थेट नागरी वस्तीत; भीतीचे वातावरण

कोल्हापूर – शिरोळ तालुक्याला महापुराच्या पाण्याचा फटका हा नागरिकांना बसला असताना पंचगंगा नदीत असणाऱ्या मगरीही आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.तेरवाड येथील 13 फूट नर जातीची मगर अनिमल रिट्रावीण असोसिएशनचा टीमने पकडून वन विभागाच्या ताब्यात दिली.

सांगली जिल्ह्याला पुराच्या पाण्याने वेढले होते नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत. तर दुसरीकडे पंचगंगा नदीत असलेल्या मगरीपैकी एक मगर ही पुराच्या पाण्यातुन शिरोळ तालुक्यातील तेरवाड मधील मंगराया मंदिरा समोर नागरिक वस्तीमध्ये मगर आल्याची प्रथमदर्शनी प्रभाकर बंडगर,आण्णाप्पा बंडगर यांना दिसली.

शिरोळ मधील अनिमल रिट्रावीण असोसिएशनचा टीम व गावकऱ्यांनी नर जातीची मगर पकडून तालुका पशु वैदयकीय चिकित्सालय जयसिंगपूर व वन विभागाच्या ताब्यात दिली,टीमचे अनिल माने,तुकाराम पाटील, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण, मालोजीराजे निंबाळकर,प्रभाकर बंडगर,आणापा बंडगर यांचासह नागरिकांनी मगर पकडण्यात मदत केली.

पुराच्या पाण्याचा फटका हा नागरिकांना बसत असताना पंचगंगा नदीत असणाऱ्या मगरीही आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.पुराच्या पाण्यातून मगरी शहरात नागरी वस्तीत आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने येत असल्या तरी मगर हिंस्त्र प्राणी असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामळे नागरिकांचा मनात मगरीच्या भीतीचे सावट पसरले आहे.

 अनिल माने (रेस्क्यू टीम प्रमुख)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.