पाकिस्तानला झटका; एफएटीएफने टाकले काळ्या यादीत 

वॉशिंग्टन – सध्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका लागला आहे. टेरर फंडिंगवर देखरेख करणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. हा एक प्रकारे भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, एफएटीएफने याआधी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. परंतु, पाकिस्तान टेरर फंडिंग थांबविण्यात अपयशी ठरली. तसेच पाकिस्तान आशिया-पॅसिफिक ग्रुप (एपीजी)च्या १० मानकांना पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली.

एपीजीच्या अहवालानुसार, कायदेशीर आणि आर्थिक यंत्रणेसाठी पाकिस्तान 40 पैकी 32 मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. याव्यतिरिक्त, दहशतवादी निधीविरूद्ध कारवाई करण्यास 11 पैकी 10 निकष पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. यामुळे एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले. काळ्या यादीत टाकल्यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज मिळवणे अधिक अवघड होणार आहे.

एफएटीएफ म्हणाले की, पाकिस्तानला टेरर फंडिंगबाबतची कृती योजना पूर्ण करण्यासाठी जानेवारीची मुदत दिली होती. परंतु, पाकिस्तान ते पूर्ण  करण्यास अपयशी ठरला आहे, तर मे 2019 पर्यंतची मुदतवाढ देऊनही कृती योजना पूर्ण करण्यास देखील अयशस्वी झाला आहे. त्यामुळे एफएटीएफने पाकिस्तानला ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.

पाकिस्तानच्या कृती योजनेत जमात-उद-दावा, फलाही-इंसानियत, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि अफगाण तालिबान या दहशतवादी संघटनांच्या निधीला आळा घालण्यासाठी केलेली पावले समाविष्ट आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.