फास्टॅगद्वारे टोलवसुली सुरू

फास्टॅग नसणाऱ्या वाहनांकडून नियमानुसार दुप्पट आकारणी

खेड-शिवापूर – खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर बुधवारपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुलीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. बुधवारी रस्त्यावर कमी वाहतूक असल्याने याठिकाणी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले.

टोल नाक्‍यावर वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्‍यावर 15 जानेवारीपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. बुधवार (दि. 15) पासून खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली सुरु करण्यात आली आहे.

सध्या या टोल नाक्‍यावरील सर्व लेन फास्टॅग करण्यात आल्या आहेत. तर एक लेन रोख टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नाही, अशा वाहनांकडून नियमानुसार दुप्पट टोल आकारण्यात येत होता. बुधवारी रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. त्यामुळे बुधवारी या टोलनाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरु होती.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here