Tokyo Olympics : सिंधूच्या यशाकडे सायनाचे दुर्लक्षच

हैदराबाद – टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक पटकावलेल्या पी. व्ही. सिंधूचे साधे अभिनंदन करण्याचे सौजन्यही फुलराणी सायना नेहवालने दाखवलेले नसल्याने या दोघींमधील वाद अद्याप कायम असल्याचेच समोर येत आहे.

ऑलिम्पिकचे पदक मिळवत सायना नेहवालने जागतिक स्तरावर भारतालाही ओळख मिळवून दिली. त्यानंतर सिंधूचा उदय झाला. जसजसे ती यश मिळवू लागली तसे तिच्या व सायनातील संबंधांत कटुता येऊ लागली.

त्यावेळी भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याच अकादमीत सराव करत असतानाही या दोघींमध्ये सलोख्याचे संबंध नसल्याचेही अनेकदा समोर आले होते. सायनाने गोपीचंद यांची अकादमी सोडून विमलकुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू केले होते. त्यानंतर काही वर्षांतच ती पुन्हा एकदा गोपीचंद अकादमीत परतली होती.

सोशल मीडियावर प्रचंड व्यस्त असलेल्या सायनाने सिंधूचे साधे अभिनंदनही केले नसल्याने या दोघींतील वाद अद्याप कायम असल्याचेच दिसत आहे. भारताच्या मीराबाई चानू व हॉकी संघाच्या कामगिरीवर त्यांना शुभेच्छा देणारे संदेश पोस्ट केलेल्या सायनाने मुद्दाम सिंधूकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.