पूजाविधी : सूर्यास्त ते रात्री 9 वाजेपर्यंत
पुणे – नरक चतुर्दशीच्या दिवशी उटणे लावून ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे साडेचार वाजता अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. पहाटे साडेचार ते सकाळी साडेसहा या वेळात, शक्यतो सूर्योद्यापूर्वी स्नान करावे. त्यानंतर देवाची पूजा करून, घरी केलेला फराळ, मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा.
नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याची दंतकथा आहे. त्यामुळे नरकासुराचे प्रतीक म्हणून कारिटे चिरडण्याची प्रथा आहे.
दीपावलीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी, दुकानांत, व्यावसायिक ठिकाणी सर्वच जण लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी सूर्यास्तापासून रात्री 9 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन करावे. नवीन वहीचे पूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवसाऐवजी बलिप्रतिप्रदेच्या (पाडवा) दिवशी पहाटे करावे, असे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.