जुन्या आठवणींना उजाळा
या दौऱ्यादरम्यान लक्ष्मण निकत यांनी पवार कुटुंबियांसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. 1986 साली ऊसतोड कामगारांच्या सुमारे पन्नास झोपड्या जळीत झाल्या होत्या. त्यावेळी स्व. आप्पासाहेब पवार व शरद पवार यांनी आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून दिल्याचे आठवणी निकत यांनी जागवल्या.
कर्जत – बारामती कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तंत्रज्ञान अद्ययावत व प्रगत आहे. कृषी क्षेत्रातील आद्य व ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी व तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र दिशादर्शक आहे. शेतकऱ्यांनी या केंद्रास भेट देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्जतचे माजी सभापती नानासाहेब निकत यांनी केले. आंबीजळगाव येथील शेतकऱ्यांसाठी आयोजित अभ्यास दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.
अभ्यास दौऱ्यात ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी विषयक माहिती दिली. शेतकऱ्यांनी दौऱ्यादरम्यान फळभाज्यांच्या रोपांचे कलम, तीस ते चाळीस लिटर दूध देणाऱ्या गाई तसेच विविध प्रगत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. दौऱ्यामध्ये नानासाहेब निकत यांच्यासह बबन रासकर, रघुनाथ निकत, राजेंद्र शिंदे, धनंजय निकत, चंद्रकांत अनारसे, मोहन निकत, बाळासाहेब निकत, आनंदराव आटोळे, जयसिंग निकत, आजिनाथ अनारसे, लक्ष्मण निकत, बाबा शेख आदींनी अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.