मुंबई – मुंबई पोलिसांना चार फेब्रुवारीला मढ आयर्लंडवर एका बंगल्यात पॉर्न चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचा फोन आला होता. पोलिसांनी तातडीने धाड टाकली. नको त्या अवस्थेत चित्रीकरण करणाऱ्या दोघांना त्यावेळी पकडण्यात आले. या चित्रीकरणासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना त्यावेळी अटक करण्यात आली आणि एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि त्याचा शेवट उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा यांना 19 जुलै अटक करण्यात झाला.
राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केलाय. कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पोंडा म्हणाले, ‘आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केलाय.’
पोंडा यांनी कोर्टात सांगितले की,’ या संबंधीत कारवाईमध्ये कलम ६७ अ ( माहिती तंत्रज्ञान) अतिशय चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली आहे. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लील साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. मात्र आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. कारण कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न म्हणजे प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवताना (संभोग करतानाचे) साहित्य म्हणजे पॉर्न असं म्हणतात. असा युक्तीवाद वकिलांनी केला.
दरम्यान, काही मोबाइल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने बनवलेल्या या पॉर्न फिल्म वितरित करणाऱ्या कुंद्राला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बीड अथवा झारखंडसारख्या मागास भागातून अभिनेत्री बनण्यासाठी मायानगरी मुंबईत आलेल्या मुलींना हेरण्यात यायचे आणि त्यांना वेब सिरीजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने बोलावण्यात येई.
प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दिवशी त्यांना अचानक स्क्रिप्टमध्ये बदल केल्याचे सांगण्यात येई. तेथे त्यांना कपडे उतरवण्यास आणि उत्तेजक दृष्ये करण्यास भाग पाडले जाई.
या महिलांनी त्यास नकार दिल्यास त्यांना शूटिंगसाठी झालेला सगळा खर्च देण्याचे दडपण आणले जाई. त्यामुळे गरीब महिलांना सांगतील ते करण्यावाचून पर्याय रहात नसे. हे चित्रीकरण केल्यानंतर हॉटहिट मुव्ही आणि हॉटस्पॉटसारख्या मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये भरत. त्याचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन देण्यात येई. तसेच समाज माध्यमांत टाकून त्यावर जाहिरातीही मिळवत असत.
पोर्नोग्राफी पिक्चर दाखवले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ऍपल स्टोअरमधून जून 2020 मध्ये आणि गुगल स्टोअरमधून नोव्हेंबर 2020 मध्ये हॉटस्पॉट हे ऍप हटवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
मढसारख्या मुंबईतील उपनगरांमध्ये भाड्याने घेतलेल्या बंगल्यावर हे प्रौढांसाठीचे चित्रपट एका दिवसांत चित्रीत केले जात असत. पाच ते सहा कर्मचाऱ्याचे पथक असे. त्यात दिग्दर्शक, संवाद लेखक, लोकेशन शोधणारे आणि वेब ऍप डेव्हलपरचा समावेश असे. लॉकडाऊनमध्ये ही ऍप लोकप्रिय ठरली होती. त्यांचे सबस्क्राइबर लाखाच्या घरात होते, असे पोलिस तपासांत स्पष्ट झाले आहे.
सुरवातीला मुंबई पोलिसांचा रोख निर्माते आणि चित्रीकरणासाठी मदत करणाऱ्यांवर होता. त्यात अशा चित्रपटांचा निर्माता रोवा खान आणि काही काळ अभिनय केलेल्या गहगा वसिष्ठ यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
त्यानंतर गुन्हे शाखेने अशी फिल्म विकणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यात हॉटस्पॉट ऍपची मालकी असणाऱ्या इंग्लंडस्थित केन्रीन प्रा. लि.शी संबंधित असणाऱ्या उमेश कामतला अटक केली. कामतची चौकशी आणि त्याच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना आढळले की केन्रिनच्या मालकीचे ऍप कुंद्रा त्याच्या मुंबईतील विआन इंडस्ट्रिजद्वारा चालवत होता. मात्र एप्रिल महिन्यात दाखल केलेल्या आरोप पत्रात कुंद्राचा उल्लेख नव्हता.
तपासाच्या पुढील टप्प्यात कामतच्या लॅपटॉपमधील टेक्निकल डाटा तपासला. त्यानंतर न्यायालयाकडे कुंद्राच्या कार्यालयाची तपासणी करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली. पोलिसांनी तेथे छापा टाकल्यानंतर त्यांना एवढे पुरावे आढळले की त्यांनी त्याला रात्री उशिरा अटक केली.
संबंधित बातम्या
‘राज कुंद्रा चांगला माणूस, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांच्यावर खोटे आरोप करतांना’
राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून अभिनेता ‘उमेश कामत’चा फोटो; वृत्तवाहिन्यांना दिला कारवाईचा इशारा
शर्लिन चोप्रा,पूनम पांडेसोबत राज कुंद्राचा सेमी पोर्नोग्राफिकसाठी करार