‘राज कुंद्रा चांगला माणूस, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांच्यावर खोटे आरोप करतांना’

पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावर राखी सावंत म्हणाली

मुंबई – उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. राज कुंद्राच्या समर्थनार्थ काही  बॉलीवूड सेलेब्सने या मुद्यावरून सोशल मीडियावर आपलं  मत व्यक्त केलं आहे.  यातच आता बॉलीवूड गायक  मीका सिंह याने सपोर्ट केला आहे तर बॉलीवूड बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतने सुद्धा राज कुंद्राला सपोर्ट केला आहे.

‘राज कुंद्रा भला माणूस, अ‍ॅपही फारच सिंपल’ मीका सिंहने दिला पाठिंबा

ती म्हणाली,’बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी शिल्पा शेट्टीने खूप मेहनत घेतली. तीच  नाव खराब करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत… राज कुंद्रा एक चांगला माणूस आहे त्यांना ठरवून  त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.” राज कुंद्रा असं काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाही, असं देखील यावेळी राखी सावंतने म्हटलंय. ती पुढे म्हणाली, ‘त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे…तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांच्यावर खोटे आरोप करताना ‘

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.