मुंबई -अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली. अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अगोदरच चार जणांना अटक झाली होती. राजच्या अटकेनंतर आणखी एकाला पकडण्यात आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत एक व्हॉट्सऍप ग्रुप असल्याचे समोर आले आहे. एच या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या ग्रुपमध्ये राज कुंद्रा आणि अन्य चौघांचा समावेश होता. अश्लील चित्रपटांच्या कारभाराविषयी या ग्रुपमध्ये चर्चा होत असायची. आपल्या या काळ्या धंद्याचे मार्केटिंग, सेल्स, त्यात सहभागी मॉडेल्सना दिले जाणारे पैसे आदींबाबत राज या ग्रुपवर चर्चा करत असायचा. पोर्नोग्राफीच्या या धंद्यात सहा जण गुंतल्याची प्राथमिक माहिती आहे. यातल्या चौघांना राजच्या अटकेच्या अगोदरच पकडण्यात आले होते, तर रियान नावाच्या एकाला राजनंतर अटक करण्यात आली आहे.
View this post on Instagram
राज कुंद्राच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महाराष्ट्र सायबर सेलमधील सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं. या दोघांचाही जबाब महाराष्ट्र सायबर सेलनं नोंदवून घेतला आहे. दोघिंनीही राज कुंद्राविरोधात आरोप केल्याचीही माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
सुत्रांच्या माहितीनुसार शर्लिन चोपडा हिनं राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता. भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अॅप्ससाठी अश्लील कंटेंट उपलब्ध करुन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता. शर्लिन चोपडा सेमी पोर्नोग्राफिकच्या आधारावर एक अॅप चालवत होती. हे पार्टटाइम काम काही चांगलं चालत नव्हतं त्यामुळे तिनं राज कुंद्राशी संपर्क केला होता. राज कुंद्रासोबत करार करुन ५० टक्के नफ्याच्या वाट्यावर दोघांमध्ये करार झाला होता. राज कुंद्रानं स्वत: या करारावर स्वाक्षरी केली होती.
View this post on Instagram
त्या मुलींचा घेतला गैरफायदा
असे म्हणतात रोज हजारो तरुण आणि तरुणी नायक किंवा नायिका होण्याचे स्वप्न घेऊन मुंबई या मायानगरीत दाखल होतात, तर त्यातले 80 टक्के लोक कुठेच काही काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर परतही जातात. मात्र, काही जण संघर्ष करत राहतात. ते विविध नायक-नायिका, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार यांची दारे ठोठावतात. त्यातून एखाद्याचे नशीब फळफळते. अन्य जण मात्र फुटकळ भूमिकांत समाधानी होत संघर्ष करत राहतात तर काही मुली मात्र चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकतात.
राज कुंद्राच्या या काळ्या धंद्यात अशाच नायिका होण्यासाठी मुंबईत आलेल्या मुली अडकल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्या मुलींना मोठ्या चित्रपटांत काम देण्याचे आमिष दाखवत प्रत्यक्षात अश्लील चित्रपटांच्या या दलदलीत त्यांना लोटण्यात आले. दर आठवड्याला एक चित्रपट अशा वेगाने या चित्रपटांची निर्मिती केली जात होती, अशी माहितीही समोर आली आहे.