Tiger Woods car crash | कार अपघातातून वूड्‌स थोडक्‍यात बचावला

लॉस एंजलिस  – जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्‌स येथे झालेल्या एका जीवघेण्या कार अपघातातून थोडक्‍यात बचावला आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून जगभरातील क्रीडापटूंनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

वूड्‌स यांच्या कारला मंगळवारी (दि. 23) लॉस एंजलिसमध्ये अपघात झाला. यात वूड्‌स यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे.

लॉस एंजलिसमधील रोलिंग हिल्स इस्टेट्‌स व रॅंचो पालोस वेरिड्‌सच्या दरम्यान सकाळी 7 वाजता ही अपघाताची घटना घडली. ब्लॅकहॉर्स रोडवरून जात असताना वूड्‌सचे कारवरी नियंत्रण गेले व ती दुभाजकाला धडकली व उलटली. हा अपघात घडाल तेव्हा वूड्‌स एकटेच प्रवास करत होते. अपघातात त्यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघातात वूड्‌सच्या पायाला फ्रॅक्‍चर झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायावर शस्त्रक्रीयाही केली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह विविध राजकीय व्यक्तींनी तसेच जगभरातील प्रसिद्ध क्रीडापटूंनीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.