- एकाच सोसायटीत आढळले 11 करोनाबाधित
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. केशवनगर, चिंचवड येथील एकाच सोसायटीत तब्बल 11 करोना बाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने ती सोसायटी सील केली आहे.
मोरया क्रीडांगणाच्या समोरील बाजूस असलेली सोसायटीत सोसायटी आहे. यापूर्वीही या सोसायटीत सुमारे 25 रूग्ण टप्प्या-टप्प्याने आढळून आले होते. मात्र एकाचवेळी 11 करोना बाधित आढळून आल्याने चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या सोसायटीत किराणा मालापासून इतर अत्यावश्यक दुकाने असल्याने मुख्य प्रवेशद्वार महापालिकेले बंद केला आहे. तसेच प्रवेशद्वारावर ‘प्रतिबंधित क्षेत्र- प्रवेश निषिद्ध’ असा फलक लावला आहे.
केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना सोसयाटीतून बाहेर सोडण्यात येत आहे. करोनाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये म्हणून या सोसायटीत घरकामासाठी येणाऱ्या मोलकरणीलाही सोसायटीत येण्यास मनाई केली आहे. “सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधवा,’ असे आवाहन स्थानिक नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी केले आहे.