बॉलीवूड ऍक्शन स्टार टायगर श्रॉफने एका पोस्टद्वारे दिवंगत पॉप किंग मायकल जॅक्सन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. टायगरने गुरुवारी जॅकसनच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या “मुन्ना मायकेल’ चित्रपटाच्या “फिल द रिदम’ आणि “बेपरवाह’ या गाण्यांवरील डान्स सोशल मीडियावर पोस्ट केला.
हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, “धुरामुळे समोर ठेवलेही वस्तू पाहू शकत नाही, मला कधीच समजू शकले नाही की, कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नाशिवाय मायकल जॅक्सन यांनी हे कसे केले. आमच्यापैकी बऱ्याच जणांसाठी आपण ब्लूप्रिंट सोडल्याबाबत खूप खूप धन्यवाद.’ या व्हिडिओमध्ये जॅक्सनचे चाहते टायगरला पांढऱ्या ड्रेसमध्ये काही लोकप्रिय स्टेप्स करताना दिसत आहे. टायगरने अलीकडेच आपल्या शर्टलेस फोटोला क्लिक करत पापराज्जीला धन्यवाद देत त्याची फिरकी घेत “इंस्टा मटेरियलच्या बाहेर आहे’ असे म्हटले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास टायगरला अखेरच्या वेळी अहमद खानद्वारा दिग्दर्शित “बागी-3′ पाहण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. परंतु अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने चित्रपटाच्या गल्ल्यावर परिणाम झाला. यात टायगरसोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.