टायगर-दिशाचे ब्रेकअप

बॉलिवुडमधील स्टार दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरवरुन हे दोघे सतत चर्चेत असतात. मात्र, या दोघांनी कधीही आपल्या रिलेशनशिपबाबत दुजोरा दिला नसला, तरी ते सातत्याने लंच आणि डिनरला एकत्रितपणे दिसतात. पण आता टायगर आणि दिशा यांच्यात ब्रेकअप झाले असून दोघांनी रिलेशनशिप तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांमध्ये टायगर आणि दिशा यांच्यातील संबंधात दुरावा आलेला आहे. हा निर्णय दोघांनी मिळून घेतला आहे. तसेच सोशल मीडियावर दिशा आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांचा जवळ येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे.

दरम्यान, टायगर आणि दिशा यांच्यातील दुराव्याचे हे कारण नाही. कारण या दोघांमधील मतभेद हे अनेक दिवसांपासून असून ते सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. पण आता दोघांनी रिलेशनशिप थांबविण्याचा निर्णय घेतला असून चांगले मित्र राहण्याचे ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)