Salman Khan : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता सलमान खानचा ‘टायगर 3’ हा चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सलमानसह शाहरुख खानच्या कॅमिओची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर टायगर-3 या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानला शत्रूंपासून वाचवत असल्याचे दिसत आहे. सलमान खान हा दुश्मनांसोबत फाईटिंग करताना शाहरुख हा एक बॉम्ब तिथे टाकतो. त्यावेळी झुमे जो पठाण हे गाणं ऐकू येत आहे. त्यानंतर शाहरुख खानची एन्ट्री होते. टायगर-3 या चित्रपटात शाहरुखनं चॉपरमधून एन्ट्री केली आहे. टायगर-3 या चित्रपटात सलमानची एन्ट्री होताच थिएटरमध्ये प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सलमान खानच्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.