Priyadarshini Indalkar – छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहचली. उत्तम आणि अचूक विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिच्या मोहक अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच सोशल मीडियावर प्रियदर्शनी वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिला आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अशातच प्रियदर्शनीला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियदर्शनी ट्रोल झाली आहे. नुकतेच प्रियदर्शनीने वेस्टर्न लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर केल्यावर अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं मात्र या लूकमुळे काहींनी तीला ट्रोल केले आहे. तर एका सोशल मीडिया युजरने तिला आक्षेपार्ह मेसेज केल्याचा प्रकार घडला आहे.
यानंतर अभिनेत्रीने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले. या स्क्रीनशॉटमध्ये नेटकऱ्याने अभिनेत्रीला अतिशय चुकीचे व विचित्र मेसेज केल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रियदर्शनीने हे अकाऊंट रिपोर्ट करण्यासाठी मला मदत करा असं कॅप्शन लिहून त्या खालोखाल संबंधित नेटकऱ्याचं युजरनेम नमूद केलं आहे.
दरम्यान सोशल मीडियावर प्रियदर्शनीचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. सोशलवर तिचे लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. तिने हास्यजत्रेत तिने विविध पात्रं साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.