अलिगड- मशिदीत एकत्र नमाज पढू दिला नाही म्हणून काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार अलिगढमध्ये घडला आहे. या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अलिगढमधील बन्नादेवी परिसरात असलेल्या मशिदीत गुरुवारी रात्री काही जण नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. त्यावेळी तेथे बंदोबस्ताला उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. मात्र ते नागरिक ऐकत नव्हते व त्यांनी पोलिसांना तेथून हुसकावून लावण्यासाठी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
दरम्यान, काही वेळाने मोठ्य प्रमाणात पोलीस फौजफाटा तेथे पोहोचला व पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच पोलिसांवर अशा प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही अशी ताकिदच देण्यात आली.