जम्मू काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे तिघेही अगदी अलिकडच्या काळातच दहशतवादी गटांमध्ये सामील झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांबाबतची खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री अनंतनागच्या पाझालपोरा भागामध्ये शोधमोहिमेला सुरुवात केली. सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी केली आणि शोधमोहिम सुरू केली. त्यावेळी एका घराच्या तपासणीला घरमालकाने विरोध केला.

त्यावरून अधिक संशय आलेल्या सुरक्षा दलांनी घराची तपासणी केली. तेंव्हा दहशतवाद्यांची गोळीबार करायला सुरुवात केली. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये हे तिघे दहशतवादी मारले गेले.

या तिघांपैकी नासीर गुलझर चंद्रू उर्फ अबू हनान हा अनंतनागमधील बिज्बेहारा येथील रहिवासी होता. तर झाहिद अहमद लोन आणि आकिब अहमद हाजाम अशी अन्य दोघांची नावे आहेत. हे तिघेही अवघ्या 20 वर्षांचे होते आणि याच वर्षी दहशतवादी गटांमध्ये सामील झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.