जम्मू: जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, याच चकमकीत गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि सुरक्षा दल एकत्रितपणे ही कारवाई करीत आहेत. पुलवामाच्या जादुरा भागात शनिवारी रात्री उशिरा चकमक सुरू झाली. सध्या या भागात लष्कराची शोध मोहीम सुरू असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.
#UPDATE: One soldier who was critically injured has succumbed to his injuries in an encounter that started last night in Zadoora area of Pulwama. Joint operation in progress: PRO Defence, Srinagar https://t.co/dX8P0q1ltT
— ANI (@ANI) August 29, 2020
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामा भागात दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जादुरा भागात या क्षेत्राभोवती शोध मोहीम सुरु केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला, त्याला उत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाने कारवाई केली.
यापूर्वी, काश्मीरमध्ये पंचायतीच्या सदस्याला ठार मारण्यासाठी जबाबदार असलेले दोन अतिरेकी हे शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी होते. किल्लूर भागात चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी अल बदर जिल्हा कमांडर शकूर रथार आणि त्याचे साथीदारही होते. किल्लूरमध्ये दहशतवाद्यांच्या असण्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई सुरू केली होती आणि किल्लूर भागात घेराव घालण्यात आला होता. पहिल्या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रल भागात शुक्रवारी पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणास सापळा रचला. पोलिसांनी सांगितले की, अवंतीपोरा येथील टाकिया गुलाबबाग त्राळ भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या असण्याच्या खास माहितीच्या आधारे सैन्य आणि सीआरपीएफने या भागात शोध मोहीम राबविली.
पोलिसांनी सांगितले की, “त्या भागात शोधाशोध सुरू असताना दहशतवादी संघटना जेएमएमच्या एका जागेचा भांडाफोड करण्यात
आला होता, त्यानंतर ते ठिकाण उद्धवस्त करण्यात आले आहे. संयुक्त पथकाला घटनास्थळावरून दारूगोळाही सापडला होता, जो तपासाच्या उद्देशाने पकडला गेला.