विद्युत जमवालच्या प्रॉडक्‍शन हाऊसचा पहिला सिनेमा “आयबी-71′

विद्युत जमवालने अलीकडेच ‘खुदा हाफिज-2’चे शूटिंग सुरू केले आहे. याचदरम्यान त्याने आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसचा पहिला सिनेमा “आयबी-71’चा घोषणा केली आहे. “राजी’साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकल्प रेड्डी या सिनेमाचे डायरेक्‍शन करणार आहे. 

हा एक जासूसी थ्रिलर स्वरूपाचा सिनेमा असणार आहे. अर्थातच सरकारी गुप्तहेराचा रोल स्वतः विद्युत जमवाल करणार आहे. ही एक रिअल लाईफ क्राईम स्टोरी असणार आहे. भारतीय गुप्तहेरांनी कशाप्रकारे पाकिस्तानी प्रशासनाला हादरे दिले होते, ते यामध्ये दिसणार आहे. सर्व युद्ध युद्धभूमीवरच लढली जात नाहीत. 

काही केवळ डावपेच आणि मुत्सदेगिरीच्या आधारेही लढली गेली आहेत. असे विजय मिळवून देणाऱ्या काही अनसंग हिरोजच्या इतिहासाला जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे विद्युत जमवालने सांगितले. 

या कथेमध्ये काही इतिहासाचेही संदर्भ असणार आहेत. याशिवाय राजकीय आणि लष्करी डावपेचांचीही रेलचेल असणार आहे. विद्युत जमवाल हिरो असणार म्हणजा त्यात ऍक्‍शनचा तडका तर असणारच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.