चाकण | ऑक्‍सिजन संपल्याने 3 रुग्णांचा मृत्यू; 20 गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले

शेलपिंपळगाव – चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्‍सिजन संपल्याने 20 अत्यवस्थ रुग्णांना मंगळवारी पहाटे तातडीने अन्यत्र हलवण्यात आले. मात्र यात तीन जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. यात नेमक्‍या किती जणांचा मृत्यू झाला त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे वैद्याकीय अधिक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले.

ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने ऑक्‍सिजन आणि व्हेन्टीलेटरवर असलेल्या 20 रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना अन्यत्र हलवण्याच्या सूचना केल्या. मध्यरात्री काही रुग्णवाहिका आल्या. यातील काही रुग्णांना नातेवाईकांनी हलवले. मात्र काही रुग्णांच्या नातेवाईकांना व्हेन्टीलेटर बेड उपलब्ध झाले नाहीत.

रूग्णालय प्रशासन पहाटे साडेतीन ते चार वाजल्यानंतर रुग्णांना देण्यासाठी ऑक्‍सिजन नसल्याचे सातत्याने सांगून सर्व रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्याच्या सूचना केल्या. अशावेळी नातेवाईक हतबल झाले. अखेरीस यातील तीन रुग्णांनी अन्यत्र जाण्याच्या प्रयत्नात ऑक्‍सिजनअभावी प्राण सोडले.

दरम्यान, या रुग्णालयात ऑक्‍सिजन संपल्यानंतर सोमवारी काही रुग्णांच्या नातेवाईकांनीच महाळुंगे येथून ऑक्‍सिजन सिलिंडरसाठी धावाधाव केली. त्यानंतर काही ऑक्‍सिजन सिलिंडर मिळाले. मात्र मंगळवारी (दि.20) पहाटे ते संपले. यात आणखी काही मृत्यु झाले आहेत का ?, याबाबतची पडताळणी सुरु असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. मृत्यू झालेल्यांपैकी 3 मृतदेहांवर चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील गॅस दाहिनीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 25 वर्षीय युवक, 45 वर्षीय इसम आणि 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.