शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले.

शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा 17 ते 27 एप्रिल या कालावधीत होणार असून यात्रेचे मुख्य दिवस 23 व 24 एप्रिल 2021 हा आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड यांनाही कळविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.