अकोले : अकोले येथे मुळा नदीच्या पात्रात आज राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व त्यांच्या दोन भाच्यांचा दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती अशी की, सुनील वाडेकर हे शिरसगाव धुपे येथे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचे दोन भाचे सचिन फापाळे आणि प्रवीण पापड (रा. पिंपळदरी हल्ली, मुंबई) हे लोकडाऊनमुळे गावी आले होते.
वाडेकर आणि त्यांचे भाचे हे चार वाजेच्या दरम्यान मुळा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले. याप्रसंगी दोन्ही भाच्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी त्यांना वाचवायला गेलेले वाडेकर यांना दोघांनी मिठी मारली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.