चिंबळी -कुरूळी (ता. खेड) ग्रामपंचायत हद्दीत करोना रुग्ण आढळून आल्याने रुग्णा राहत असलेला परिसर कंन्टेमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तर त्या परिसरात येणारे रस्ते बांबू लावून सील करण्यात आले आहेत.
रुग्ण आढळून आलेल्या परिसरासह गावात करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या कुरूळी येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे. तर घरोघरी जावून माहितीही घेतली जात आहे, अशी माहिती आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सारिका लमाटे यांनी दिली.
तर गावात मास्क न घालता व इतर नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सरपंच सचिन कड, ग्रामविकास अधिकारी छाया इरणक, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, आशा वर्कर, सर्व कर्मचारी यांनी माहिती दिली.