पुणे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट परिसरात रविवारी अल्पसा पाऊस झाला. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून एकूण 3 हजार 170 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 28.39 टीएमसी म्हणजे 97.41 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. रविवारी दिवसभरात खडकवासला धरणात 1 मिमी, पानशेत धरणात 3 मिमी, वरसगाव धरणात 2 मिमी आणि टेमघर धरणात 2 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार 30 क्युसेकने आणि नदीत 2 हजार 140 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर वरसगाव धरणातून 1 हजर क्युसेक आणि पानशेत धरणातून 600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
धरण – पाणीसाठा (टक्के)
खडकवासला – 100
पानशेत – 100
वरसगाव – 100
टेमघर- 79.62