फलटण, (प्रतिनिधी) – विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या सहा वर्षांपासून फरारी असलेल्या एका महिलेसह तिघांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील फरारी संशयितांना अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सपोनि विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शांतिलाल ओमासे, पोलीस नाईक तात्या कदम, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे, दडस नितीन चतुरे यांचे पथक तयार केले आहे.
हे पथक मंगळवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करत असताना, विविध गुन्ह्यातील फरारी संशयित बंदकुलिया उर्फ गोविंद भगवान काळे (वय 70), लाकड्या भगवान काळे (वय 30), पिंगा पुण्या काळे (वय 35, रा. सोनवडी, ता. फलटण) हे त्यांच्या घरात सापडले. त्यांना अटक करून, न्यायालयात हजर करण्यात आले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.