नगर – दिवाळी म्हणजे फटाके हे लहान मुलांचे प्रमुख आकर्षण असते पंरतु याला फाटा देत लहान मुलांकरीता फटाकेमुक्त दिवाळी हा उपक्रम सातत्याने गेली 5 वर्षांपासून आम्ही राबवत आहोत यात विद्यार्थी सह पालकही मोठया संख्येने सहभागी होत आहेत पालकाकडे फटाके आणू नका असा आग्रह मुले धरतात अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम या माध्यमातून ही मुले करीत आहेत असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुरेश शेवाळे यांनी केले.
लालटाकी रोडवरील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत 963 फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शेवाळे म्हणाले, सर्व सण, उत्सव यांत नेहमीच आम्ही सहभागी होतो फटाक्याच्या पैश्याचा उपयोग गोरगरीब, अनाथ गरजूंना मदत करून दिवाळी साजरी करणार आहोत. निरोगी व प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी प्रयत्न करू. फटाके न उडवण्याची शपथ दीपक इरोळे यांनी दिली. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.