महिलेच्या गळ्यातील गंठण धूमस्टाइलने लांबविले

गुलमोहोर रोडवरील घटना : तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद 

नगर – वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी धूमस्टाइल लांबविले. गुलमोहोर रोडवरील नरहरीनगर येथे ही घटना घडली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नलिनी विठ्ठल लांभाते (वय 71, रा. नरहरीनगर, गुलमोहर रोड) ही सेवानिवृत्त महिला घराच्या कंपाऊंड जवळ उभी असताना दुचाकीवरून दोन चोरटे आले.

त्यातील पाठीमागील बाजूस बसलेल्याने लंभाते यांच्या गळ्यातील सोन्याचे बारा ग्रॅम वजनाचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. चोरीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हारुण मुलांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. नलिनी लंभाते यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.