मंचर, (प्रतिनिधी) –रॅम्पबरोबर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ हजारो दिव्यांग बांधवांनी घेतल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी सोमवार, दि. १३ रोजी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३३८ मतदान केंद्र असून प्रत्येक मतदार केंद्रामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी पथक तैनात करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर लहान बाळ असलेल्या महिला मतदारांसाठी पाळणाघर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तालुक्यांतील विविध मतदान केंद्रास नायब तहसीलदार सचिन मुंडे, डॉ. सचिन वाघ,सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, मतदार जनजागृती पथकाच्या नोडल अधिकारी सविता माळी, सुनील भेके, नारायण गोरे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहूल रहाटडे,
अभिजीत नाटे, विनायक राऊत, सुरेश रोंगटे, मंगेश जावळे, काशिनाथ घोंगडे, सचिन तोडकर यांनी भेट दिली. दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सोयी सुविधा बद्दल मंचर येथील शशिकांत कडदेकर यांनी समाधान व्यक्त केले.