जुन्नर (पुणे) –जुन्नर तालुक्यातील करोनाचे रुग्णांनी हजाराचा टप्पा पार केला आहे. शनिवारी 73 रुग्ण आढळले असून तालुक्यातील रुग्णसंख्या 1071 झाली आहे.
हॉटस्पॉट बनत असेलल्या नारायणगाव व ओतूर येथे प्रत्येकी 9, येणेरे येथे 8, पिंपरी पेंढार 6, जुन्नर, आळे, वडज प्रत्येकी 5, खिलारवाडी 4, काळवाडी, निमगाव सावा, डिंगोर पत्येकी 3, आळेफाटा 2, मांजरवाडी, धोलवड, वडगाव आनंद, काटेडे, ओझर, येडगाव, राजुरी, शिरोली बद्रुक, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, उंब्रज नं. 1 या गावांमध्ये प्रत्येकी 1 करोनाबाधित आढळले आहेत.