अकरावी प्रवेश : यंदा नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ वाढला

पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ 3 ते 8 टक्क्याने वाढला. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला. मागील वर्षी तोच 77.10 टक्के होता. पुणे विभागाचा यंदाचा निकाल 97.34 टक्के लागला. मागील वर्षी 82.48 टक्के होता. पुणे जिल्ह्याचा निकाल 97.93 टक्के लागला. 15 हजार 466 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. 12 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले. अकरावी प्रवेशासाठी बेस्ट ऑफ फाईव्हच्या गुणांचा विचार केला जातो.

यंदा विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण मिळाले. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा लागली. पसंतीक्रम नोंदवितानाही नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यालाच प्राधान्य दिले. मागील वर्षी निकाल कमी लागल्याने कट ऑफ घसरला. यंदा मात्र वाढला आहे.

गुण व कट ऑफ यांची सांगड न बसल्याने काही विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही. कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांच्या कट ऑफमध्ये वाढ झाली. पहिली गुणवत्ता यादी जाहीर करत असतानाच महाविद्यालयांचे कट ऑफही जाहीर करण्यात आल्याची माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिना शेंडकर यांनी दिली.
———–
मॉर्डन महाविद्यालयाचा शाखा निहाय कट ऑफ –
कला (अनुदानित, इंग्रजी माध्यम) – 75.80 टक्के
कला (विनाअनुदानित, इंग्रजी) – 95 टक्के
वाणिज्य (अनुदानित) – 92 टक्के
वाणिज्य (विनाअनुदानित) – 90.20 टक्के
विज्ञान (अनुदानित) – 94.80 टक्के
विज्ञान (विनाअनुदानित) – 94.20 टक्के
————
फर्गसन महाविद्यालय
कला (इंग्रजी माध्यम) – 97.40 टक्के
कला ( मराठी माध्यम) – 92 टक्के
विज्ञान (अनुदानित ) – 97 टक्के
विज्ञान (विनाअनुदानित) – 96.80 टक्के
—————-
बीएमसीसी महाविद्यालय –
वाणिज्य (अनुदानित) – 96.4 टक्के
वाणिज्य (विनाअनुदानित) – 95.4 टक्के
————-
आबासाहेब गरवारे महाविद्यालय
विज्ञान – 94.8 टक्के
कला – 74.6 टक्के
————–
सर परशुरामभाऊ महाविद्यालय –
कला – 84.6 टक्के
वाणिज्य – 92.6 टक्के
विज्ञान – 95.2 टक्के
———–
सिम्बॉयसीस महाविद्यालय
कला – 96.6 टक्के
वाणिज्य – 94 टक्के

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.