नवी दिल्ली : देशाच्या ऐतिहासिक चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते इंडिगोच्या विमानाने प्रवास करत असताना त्यांचे विमानात भव्य स्वागत करण्यात आले. इंडिगोच्या एअर होस्टेसने त्यांचे खास पद्धतीने स्वागत केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशलमिडीयावर चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ सध्या चर्चेत आहेत. एस. सोमनाथ गुरुवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवास करत होते, त्यावेळी फ्लाइटमध्ये त्यांची उपस्थितीमुळे प्रवासी आणि एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
Video of an Indigo crew member proudly announcing the onboarding of the distinguished passenger Sri S. Somnath, Chairman of ISRO has gone viral on SM.#Chandrayaan3 pic.twitter.com/xNy9pK04Gu
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 31, 2023
इंडिगो एअरलाइन्सच्या एअरहोस्टेसने प्रवाशांना इस्रो प्रमुखांच्या फ्लाइटमध्ये उपस्थित असल्याची माहिती दिली तेव्हा संपूर्ण विमान टाळ्यांचा कडकडाटझाला. इंडिगोच्या एअर होस्टेसने घोषणा केली, ‘आमच्या फ्लाइटमध्ये देशाचे हिरो असणे ही नेहमीच अभिमानाची गोष्ट असते. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ आज आमच्या फ्लाइटमधून प्रवास करत आहेत, त्यांच्या उपस्थितीने आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्यांचे स्वागत करतो. श्री. एस. सोमनाथ, तुम्ही आमच्या फ्लाइटमध्ये यावे अशी आमची इच्छा आहे. तुमचा अभिमान वाटतो, खूप खूप धन्यवाद.
एअरहोस्टेसच्या या घोषणेनंतर आणखी एका केबिन क्रूने तिला एक खास भेट दिली. या दरम्यान एस. सोमनाथ यांना त्यांच्या जवळ पाहून प्रवासी आनंदी दिसत होते. एस.सोमनाथ यांनी सर्व प्रवाशांचे स्वागत हसून स्वीकारले.