हडपसर : पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २६ मंहमदवाडी-कौसरबाग मधील हडपसर सर्वे. नंबर ५४ मधील नाल्यालगत डी.पी मध्ये १८ मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा रस्ता विकसित झालेला नाही. हा रस्ता विकसित केल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे. महापालिकेने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून निवेदन देण्यात आल्याचे माजी नगरसेविका विजया पोपट वाडकर यांनी सांगितले.
माजी नगरसेविका वाडकर म्हणाल्या की, ‘गेली अनेक महिने या रस्त्याचा प्रश्न रेंगाळत आहे.उर्वरित भागात रस्ता वापरासाठी असतानाही केवळ काही भागातील रस्ता अद्यापही रखडला आहे.त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भेट घेऊन यावर चर्चा केली.
नागरिकांच्या सोयीसाठी हडपसर सर्वे नंबर 54 मधील जागा मालकाला योग्य तो मोबदला देऊन ताबा घेण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खाते प्रमुखांना उचित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती या चर्चेच्या वेळी त्यावेळी पालकमंत्र्यानी त्याची दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. असेही माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी सांगितले.
ही निवेदने महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , शहर अभियंता, मुख्य अभियंता पथविभाग, उपआयुक्त मालमत्ता व व्यवस्थापन विभाग यांनाही दिल्याचे वाडकर यांनी सांगितले. या परिसरात सेलेना पार्क सोसायटी, कुमार पेबल पार्क सोसायटी ,राहुल ईसट सोसायटी, रतन हाउसिंग सोसायटी, मारीगोल्ड सोसायटी, काळेपडळ व उरुळी देवाचीचा भाग असून हा रस्ता विकसित न झाल्याने नागरिकांना जे.एस.पी.एम कॉलेज मार्गे वळसा घालून जावे लागत आहे.
फक्त हडपसर सर्वे नंबर 54 मधील रस्ता विकसित होणे बाकी असून पुढे सर्व रस्ता तयार आहे. हा रस्ता तयार झाला तर नागरिकांना द्वारका स्वीट होम, सातव नगर ,हांडेवाडी रोड येथे जाण्यास सोयीस्कर होईल.असेही वाडकर यांचे म्हणणे आहे.