मुंबई – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कामावर जाणाऱ्या प्राध्यापक तरुणीला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाविरोधात हिंगणघाटमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले होते.
दरम्यान, या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कठोर शब्दात टीका केली आहे. सोशल मीडियावरून मनसेने आरोपीवर जबर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून एक फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये घडलेली घटना मन हादरवून टाकणारी असल्याचे म्हटलं आहे.