हे तर महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे ‘षडयंत्र’

मुंबई –  हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या विषयाचा दि एन्ड होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला आता राजकारणानेही वेढा घातला आहे.

यातच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचा संजय राऊत यांचा आरोप केला आहे .

संजय राऊत म्हणाले की,’या  प्रकरणावरुन राजकारण नकोच. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो हीच माझी प्रार्थना आहे . हे तर महाराष्ट्र सरकारला केवळ  बदनाम करण्यासाठी षडयंत्र आहे असा पुन्हा एकदा त्यांनी आरोप केला

सुशांतच्या कुटुंबियांच्या  मागणीबाबत ते पुढे म्हणाले,’आम्हाला खूप काम आहे. आम्हाला 50-100  नोटिसा येत राहतात. बाकी काही मला माहिती नाहीये. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली आहे, तर मी माफी मागेल, असं राऊत यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, सुशांत सिंह राजपूतचे त्यांचा वडिलांशी के. के. सिंह यांच्यातील नाते संबंध घनिष्ट नव्हतं. मात्र याच विधानावर सुशांतच्या कुटंबियांनी संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.