मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. गदर प्रमाणेच आता या चित्रपटाचा दुसऱ्या भाग सुपरहिट होण्यासाठी सनी देओल आणि अमिषा पटेलने प्रमोशनला सुरुवात केली आहे. मंगळवारी अमिषाने माहीम येथील दर्ग्याला भेट दिली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावरून आता अमिषाला ट्रोल केले जात आहे.
यावेळी तिने लोकांना अन्नाचे वाटपही केले. यावरून तिचे काही जण कौतुक करत आहे. तर काही जण तिच्यावर टीका करत आहेत. अमिषाच्या या व्हिडिओवर यूजर्स कमेंट करत आहेत. ‘असे दिसते आहे की गदर 2 फ्लॉप होणार आहे’, ‘राम मंदिरात जा, ‘आता तुम्ही तिथे काहीतरी करू शकता,’ ‘हिट होण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जातात,’ ‘सकीना पुन्हा पाकिस्तानात गेली,’ अशा कमेन्ट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, ‘गदर 2′ चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, जो ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार होता. मात्र ‘गदर 2’ मध्ये तो आता नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.