मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘लस्ट स्टोरीज’ आणि द ट्रेलच्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे.लस्ट स्टोरीजचा दुसरा सीझन २९ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. याशिवाय ‘द ट्रायल’ 19 जुलै रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.
दरम्यान, काजोलने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत. हा रंग तिचा आवडता रंग असल्याचे काजोलने चाहत्यांना सांगितले आहे. अनेकांनी काजोलच्या लूकचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
One of my favourite colours… and now u know why 😜 pic.twitter.com/kmYVWTh0mG
— Kajol (@itsKajolD) June 25, 2023
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना काजोलने लिहिले, “माझ्या आवडत्या रंगांपैकी एक… आणि आता तुम्हाला कळले का?” ट्विटरवर वापरकर्त्यांनी तिला विमल पान मसाला म्हटले आहे. एका युजरने लिहिले, “विमला.” विमल पान मसाल्याच्या पॅकेटचा फोटो शेअर करत तिला ट्रोल केले आहे.
या वर्षीचा सुपरहिट चित्रपट ‘पठाण’ च्या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकिनीवरून बराच वाद झाला होता. या गाण्यात दीपिकाने भगवी बिकिनी परिधान केली होती. या चित्रपटाला देशभरातून विरोध झाला होता. चित्रपटाचे पोस्टर्स जाळण्यात आले, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे लोक म्हणाले.