बेल्हे -जाधववाडी (ता.जुन्नर) येथील गावठी दारू बनणाऱ्या अड्ड्यावर आळेफाटा पोलिसांनी धाड टाकून 12 लाख 76 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले आहे. तर संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
सध्या करोनाचा संसर्ग वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी अवैध धंद्यांवर लक्ष देऊन कारवाई सुरू केली आहे. जाधववाडी येथील गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता कुकडी नदीपात्रालगत 2 हजार लीटरच्या 4 टाक्या व इतर प्लॅस्टिक तसेच लोखंडी 15 बॅरल असे सुमारे 12 लाख 76 हजार रुपये किमतीची हातभट्टी दारूला लागणारे रसायन आढळून आले.