देहूगाव – हळदीच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना अज्ञात दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोघा चोरट्यांनी एका महिलेचे पावणेसात तोळे वजनाचे एक लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पळून गेले. ही घटना देहूगाव वैकुंठ गमन येथे सोमवारी ( दि.9) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मीनल मुकेश मोरे (वय 38, रा.इंद्रायणी वाटिका, परंडवाल चौक, देहूगाव ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिनल व तिची जाऊ जाई या दोघी जणी हळदीच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना अज्ञात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी मिनलच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकाऊन घेऊनदुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार तपास करीत आहे.