मंचर – मंचर बस स्थानकावर अंदाजे 70 ते 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत मंचर बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक संभाजी दाते यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सकाळी सहाच्या सुमारास वाहतूक नियंत्रक दाते मंचर बस स्थानक येथे कामावर आले असता त्याना स्थानकाजवळील कॅंटिनसमोर 70 ते 75 वर्षे वयाचा पांढरे केस व दाढी, अंगात पांढरा शर्ट व कमरेखाली टॉवेल घातलेली सडपातळ व्यक्ती झोपलेली दिसली.
दाते यांनी या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही. त्यांनी सरकारी रुग्णवाहिकेद्वारे त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेण या ज्येष्ठ व्यक्तीची ओळख पटली नसून, या व्यक्तीबाबत कुणाला माहिती असल्यास मंचर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.