वडगाव मावळ – दारुंब्रे येथील काळभैरवनाथ व वाघजाई माता उत्सव निमित्ताने आयोजित कुस्ती आखाड्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिलाला. मात्र, या आखाड्यात कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाला देण्यात आलेल्या बक्षिसांमुळे तुम्हीदेखील चक्रावून जाल. आखाड्याचा फड गाजविणाऱ्या पै. नागेश राक्षे याने दुभत्या गाईचे बक्षीस जिंकले आहे. तर अन्य पैलवानांनी वजन गटानुसार पाच बकरे जिंकत मोठ्या ऐटीत घर गाठले आहे.
मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच यात्रा प्रसिद्ध आहे. करोना प्रादूर्भावामुळे दोन वर्षे ही यात्रा झाली नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर गावजत्रा साजरी होत असल्याने कुस्ती आखाड्याला प्रमुख आकर्षक बक्षीस म्हैस, पाच बकरे व एक चांदीची गदा ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुस्ती आखाड्याला पंचक्रोशीतील पैलवानांनी तसेच शौकिनांनी उपस्थिती लावली. सरपंच पै. राजेश वाघोले यांच्या वतीने कुस्ती स्पर्धेत म्हैस व पाच बकरे हे बक्षीस ठेवण्यात आले होते. तर पै. राकेश सोरटे यांनी चांदीच्या गदेचे पारितोषिक ठेवले होते.
नागेश राक्षे यांनी कुस्तीत म्हैसीचे बक्षीस जिंकले. तर इतर पैलवानांनी वजनी गटानुसार पाच बकर जिंकले. अनेक पैलवानांना रोख रक्कम बक्षीसही देण्यात आले. कुस्ती आखाड्यात पंच म्हणून वस्ताद बबनराव वाघोले, माजी उपसरपंच विजय वाघोले, माजी उपसरपंच पै. गणेश वाघोले, मावळ केसरी पै राकेश सोरटे मावळ केसरी पै. विश्वास वाघोले, पै. रामदास वाघोले, पै.संदिप सोरटे, जनार्दन वाघोले म्हणून आदींनी काम पाहिले.
यावेळी सरपंच उमेश आगळे, उपसरपंच शांताराम वाघोले, ग्रामपंचायत सदस्य संदिप सोरटे, गणेश वाघोले, काळुराम वाघोले, ईश्वर वाघोले, शरद भालेकर, अनिल वाघोले, श्रीकांत वाघोले, दिलीप राक्षे, माजी सरपंच पै.मनोज येवले, उत्सव कमिटी पोलीस पाटील लक्ष्मण शितोळे, गुलाबराव वाघोले आदी उपस्थित होते. कुस्ती आखाड्याचे सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत वाघोले व संतोष सोरटे यांनी केले.