मुंबई – साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ चा टीझर गेल्या महिन्यात रिलीज झाला आहे. अॅक्शन पॅक्ड पॅन इंडिया हा चित्रपट या वर्षी किंवा येत्या वर्षभरात प्रदर्शित होईल. पण चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याआधीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज केला आहे. यासोबतच या चित्रपटाचे एक पोस्टरही रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये अल्लू अर्जुन अतिशय विचित्र लूकमध्ये दिसत आहे.
‘पुष्पा’ने गळ्यात लिंबाचा हार, फुलांचा हार आणि वजनदार दागिने घातले आहेत. बोटात खूप जड अंगठ्या, हातात बांगड्या, निळी साडी आणि ब्रोकेड ब्लाउज नाकात नथ आणि निळा रंग अंगावर आणि चेहऱ्यावर लावलेला. एका हातात रिव्हॉल्व्हरही दिसत आहे. आणि उभं राहण्याची शैली अगदी जुन्या ‘पुष्पा’सारखी दिसली.
A key schedule of #Pushpa2TheRule completed with ‘Bhanwar Singh Shekhawat’ aka #FahadhFaasil 💥💥
This time he will return with vengeance ❤️🔥🔥
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku @ThisIsDSP @SukumarWritings @PushpaMovie @TSeries pic.twitter.com/l4lixpvhm7
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) May 18, 2023
सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून, नुकतंच या चित्रपटातील आणखी एका महत्वाच्या कलाकाराचा लूक समोर आला आहे. आता ‘पुष्पा 2’च्या सेटवरून अभिनेता फहाद फाजीलचा एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. फहादने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचं स्पष्ट झालं असल्याने चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत.
फहाद फाजीलचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची बातमी ट्वीट करत निर्मात्यांनी दिली आहे. फहाद फाजीलने ‘पुष्पा’मध्ये एसपी भंवर सिंह शेखावत या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.